पुणे

शेतकऱ्यांना रास्त दरात शेती औषधे-बियाणे देणार

CD

बारामती, ता. १६ : ‘‘शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान व एआय प्रणालीचा वापर करून शेतीपूरक उपाय देण्याचे काम बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ करीत आहे. या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या बारामतीच्या शेती औषधे, बियाणे व खतांच्या होलसेल व रिटेल विभागाचे उद्‌घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथे शुक्रवारी (ता. १३) झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी संघाने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
गेल्या ६३ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने शेती औषधे, बियाणे व खते यांचा पुरवठा करताना मार्गदर्शनाची परंपरा जपली आहे. संस्थेची आर्थिक उलाढाल चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीअखेरपर्यंत १६० कोटी रुपयांहून अधिक झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष संजय कोकरे, बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, मदन देवकाते, दत्तात्रेय वावगे, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन देवकाते, संचालक मंडळातील सदस्य, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, व्यवस्थापक नीलेश लोणकर उपस्थित होते.
अध्यक्ष ॲड. रवींद्र माने यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष नितीन देवकाते यांनी आभार मानले.

14658

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT