पुणे

बारामतीत निर्बीजीकरण यंत्रणा अपुरी

CD

मिलिंद संगई
बारामती, ता. १७ : भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न बारामतीतही भीषण स्वरूपाचा आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या मोठी असून, ती वेगाने वाढते. तुलनेने निर्बीजीकरणासाठी असलेली यंत्रणा अगदीच तुटपुंजी आहे. ही संख्या व उपाययोजना प्रभावी होण्याची गरज आहे.
भटक्या कुत्र्यांची वाढत जाणारी संख्या ही नागरिकांसाठी डोकेदुखी आहे. मध्यंतरी नगरपरिषदेने भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती, पण कुत्र्यांची संख्याच इतकी मोठी आहे की कोणत्याच यंत्रणेला त्यावर नियंत्रण ठेवणे आता अशक्य झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनांत वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चावा ही एक बाब झाली, कुत्रे अचानक रस्त्यात आडवे आल्याने अपघात होऊन अपंगत्व येण्यासह हाडे मोडणे, गंभीर जखमी होणाऱ्यांचीही संख्या कमी नाही.

समस्येची व्याप्ती...
बारामती नगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या शेकडोंमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील गावठाण व उपनगरातील नवीन वसाहती तसेच औद्योगिक परिसरात कुत्र्यांचा त्रास अधिक जाणवतो. रात्री व पहाटेच्या वेळेत कुत्र्यांची टोळकी रस्त्यावर फिरतात. कामगार, विद्यार्थी, महिला व नागरिकांना भटकी कुत्री चावण्याचा धोका असतो.

गेल्या वर्षी चावा घेतलेल्यांना लसीकरण
सिल्व्हर ज्युबिलीमध्ये : १६२९
रुई : ३६८


समस्येमागील कारणे
शहरातील अपुरी कचरा व्यवस्थापन व्यवस्था
उघड्यावर टाकले जाणारे अन्न
नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे न राबविला जाणे
काही नागरिकांकडून कुत्र्यांना अनियंत्रितपणे खाऊ घालणे

नागरिकांच्या मागण्या
कुत्री पकडून निर्बीजीकरण तातडीने करावे
ज्या कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना बॅच लावावेत
पाळीव कुत्र्यांसाठी कडक नियमावली करावी
कुत्री पकडणाऱ्या पथकांतील सदस्यांची संख्या वाढवावी

नसबंदी व लसीकरण मोहिमा राबवल्या जात आहेत. कुत्रे पकडून निर्बीजीकरण करण्यासाठी यंत्रणा उभारत आहोत. यंदाच्या अर्थसंकल्पात मोकाट जनावरे पकडण्याची तरतूद नगरपरिषदेने केलेली आहे.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती

पहाटे व रात्री उशिरा दुचाकीवर बाहेर पडण्याचीच भीती वाटते. मध्यंतरी एका सेवानिवृत्ताच्या अंगावर कुत्रे धावून गेल्याने ते पडले व त्यात त्यांचा हात मोडला. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, अन्यथा एखाद्या निरपराध नागरिकाचा यात बळी जाईल.
- सुनील जोगळेकर, नागरिक, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT