पुणे

बारामतीत ‘फॅन्सी नंबर’चा लिलाव जाहीर

CD

बारामती, ता. १७ : खाजगी दुचाकी वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एमएच ४२ बी एक्स’ या नवीन क्रमांक मालिकेला सुरुवात करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक (फॅन्सी) क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुकांनी तिप्पट शुल्कासह सोमवारी (ता. २३) सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत धनाकर्ष (डी. डी) सह अर्ज सादर करावेत. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी त्याच दिवशी सायं. ४.३० वाजता सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यानंतर संबंधित अर्जदारांनी मंगळवारी (ता. २४) दुपारी ३.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटातून जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. जमा करावा. त्याच दिवशी सायं. ४ वाजता अर्जदारांसमोर लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कम भरणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक देण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता. २४) खाजगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या अर्जांची यादी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर बुधवारी (ता. २५) दुपारी ३.३० पर्यंत लिलावासाठी डी. डी. जमा करून सायं. ४ वाजता लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
‘‘एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही तसेच भरलेले शुल्क परत मिळणार नाही,’’ अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT