पुणे

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली सव्वा कोटी रुपयांची फसवणूक

CD

बारामती, ता. ३१ : शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका व्यावसायिकांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारीमध्ये त्यांना ‘F24 Indian Stock Market Investors Discussion Group’ या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमधील व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याचे सांगत विश्वास संपादन केला. यानंतर ‘Farley LLC’ नावाचे ॲप डाऊनलोड करून त्यावर ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवणूक करून नफा मिळत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगून आरोपींनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली. २५ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून विविध बँक खात्यांवर आरटीजीएस व इतर माध्यमातून रक्कम पाठवण्यात आली. एकूण १ कोटी ३० लाख रुपये जमा केल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर संबंधितांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT