पुणे

बारामतीच्या रिंगणातून अखेर कॉंग्रेसची माघार

CD

बारामती, ता. ९ : विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲड. आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. वरिष्ठांकडून आलेल्या निरोपानंतर त्यांनी हा अर्ज माघारी घेतला.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस वगळता इतर सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तर ही निवडणूक प्रथा व परंपरेचा विचार करता बिनविरोधच व्हायला हवी, अशी मागणी केली होती. त्यांनी याबाबत आवाहनही केलेले होते.
ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनीही अगदी शेवटच्या क्षणी मान्यवरांनी केलेली विनंती मान्य करत व सहानुभूतीच्या वातावरणाचा विचार करता उमेदवारी अर्ज न दाखल करण्याची सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या वेळेस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यातच खासदार पार्थ पवार यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर पुन्हा वादाचा मुद्दा तयार झाला. तरीही त्या नंतर राजकीय पटलावर मोठ्या हालचाली झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कॉंग्रेसने उमेदवार देऊ नये, अशी जाहीर भूमिका मांडली. आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत उमेदवार न देण्याविषयी विनंती केली. एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका विचारात घेता अखेर कॉंग्रेसनेही या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. आकाश मोरे यांनी शेवटच्या काही मिनिटात आपला अर्ज माघारी घेत या नाट्यावर पडदा पाडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT