बारामती, ता. १० : शहरातील एका हॉस्पिटलशी संबंधित दोन बँक खात्यांमधून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाइन अपहार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार या बाबत फिर्याद दिली आहे. यात नमूद केले आहे की, सोमवारी (ता. ६) संबंधित हॉस्पिटलच्या फेडरल बँक शाखेतील खात्यातून ४८ लाख रुपये तर संबंधित डॉक्टर यांच्या खात्यातून ४४ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ९२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने दुसऱ्या खात्यात वर्ग करून अपहार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.