पुणे

बारामती निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुटी

CD

बारामती, ता. २० : बारामती विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (ता. २३) पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार मतदारसंघातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी देणे बंधनकारक राहणार आहे.
सदर सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू राहील. यामध्ये खासगी कंपन्या, दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल, आयटी कंपन्या, तसेच विविध व्यापारी व औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील. याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर असेल. मतदानासाठी आवश्यक सुटी अथवा सवलत न दिल्यामुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT