पुणे

बारामतीतील विजयाला दुःखाची किनार

CD

बारामती, ता. ४ : विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या असल्या, तरी या विजयाला अजित पवार नसण्याच्या दुःखाची एक किनार होती.
एरवी विधानसभेची मतमोजणी म्हणजे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, जल्लोषाची तयारी, घोषणा, बॅनरबाजी, कमालीची उत्सुकता...असे काहीसे वातावरण असते. आज मात्र ना कार्यकर्त्यांची गर्दी, ना उत्सुकता असेच वातावरण होते. मतमोजणी केंद्रातील मोजके कार्यकर्ते वगळता कोणीही मतदान केंद्राकडे फिरकलेही नाही. बारामतीत सोमवारी (ता. ४) मतमोजणी झाली खरी, पण असे वातावरण ना कार्यकर्त्यांनी ना शासकीय अधिकाऱ्यांनी, ना पोलिसांनी ना पत्रकारांनी कधी अनुभवले होते.
सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याने आकडेवारी फोनवरून घेण्याकडे कार्यकर्त्यांचा कल होता. प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारीही काहीच ताणतणाव नसल्याने निवांत बसून होते. ‘आमचा नेताच गेला, त्याचे दुःख मोठे आहे, त्यामुळे उत्साहच वाटत नाही,’ अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. माजी मंत्री संजय बनसोडे हे जय पवार यांच्यासमवेत काही काळ मतमोजणी केंद्राच्या परिसरात उपस्थित होते. निकालाचा कल स्पष्ट होताच अनेक कार्यकर्ते निघून गेले.
सुनेत्रा पवार यांना ऐतिहासिक विजय मिळावा, या साठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केलेले होते. घटलेल्या मतदानामुळे हा विक्रम साध्य होईल की नाही, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता होती. निकालाची टक्केवारी समोर आल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक कार्यकर्त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या अजित पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. माजी मंत्री संजय बनसोडे यांनीही सुनेत्रावहिनींच्या निवडणुकीसाठी काम करायला मिळाले, ही दादांना आदरांजली असल्याचे नमूद केले.
दरम्यान स्वतः सुनेत्रा पवार यांनीच समाजमाध्यमांवर जल्लोष करू नका, मिरवणूक काढू नका,’ अशा सूचना दिल्याने अत्यंत संयमी पद्धतीने कार्यकर्त्यांनी हा विजय स्वीकारल्याचे बारामतीत पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT