बारामती, ता. २६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १००व्या साहित्य संमेलनानिमित्त बारामती शाखेच्या वतीने बुधवारी (ता. २८) विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नटराज नाट्य कला मंडळाचे किरण गुजर यांनी केले आहे.
सकाळी १०.३० वाजता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदानगर येथील पीजीआरसी सेंटर येथे एकांकिका सादर होतील. यावेळी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राज काझी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि प्राचार्य राजकुमार देशमुख उपस्थित राहणार आहेत. शारदानगर येथे ‘रंग जगण्याचा’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.
दुपारी चार वाजता डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात एकांकिका लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या विषयावर परिसंवाद होईल. योगेश सोमण, राज काझी, ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते श्रीष देशपांडे आणि नाट्यदिग्दर्शक विवेक पांडकर सहभागी होतील.
सायंकाळी ५. ३० वाजता याच सभागृहात अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी संवाद होणार आहे.
सायंकाळी सात ते नऊ या वेळेत तिरंगा सर्कल परिसरातील नटराज नाट्य कला मंदिरात ‘आठवणीतील अजितदादा : लब्जों का सफर’ हा श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्रम होईल. गायिका तेजस्विनी पाहुजा, गायक आशिष देशमुख आणि आकाश सोळंकी सादरीकरण करतील. वाद्यवृंद संचालन मुकेश दैडिया करणार असून रशीद शेख, अपूर्व द्रविड आणि नंदू डेव्हिड साथसंगत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.