पुणे

‘एलिव्हेटेड’चे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका

CD

चाकण, ता. ६ : नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोलवसुली नको, अशी भूमिका घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून टोलवसुली बंद करण्याची मागणी केली आहे.

दोन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या ८-९ वर्षांपासून नागरिक सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा टोल आकारल्यास जनक्षोभ होऊ शकतो, असा इशारा देऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी चौपदरीकरणाचा खर्च वसूल झाल्यानंतर गतवर्षी टोलआकारणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याच्या स्थितीत काहीच फरक पडलेला नाही, याकडे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या विचारात घेऊन मंत्री गडकरी टोलवसुली स्थगित करण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांना आर्थिक गैरव्यवहारात ‘क्लीन चिट’, महिलांना शिवीगाळ केल्याच्या आरोपांचं काय?

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज लातूरमध्ये अंत्यसंस्कार

Pune News : होऊ द्या खर्च! ‘चॉइस नंबर’साठी मोजले ७१ कोटी

Manikrao Kokate : राज्यात एका जिल्ह्यात ‘एक खेळ, एक संघटना’; माणिकराव कोकाटेंची माहिती; लवकरच नवे क्रीडा धोरण!

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav : ‘सवाई’ कलाकारांना ‘सवाई’ प्रेक्षकांची दाद!

SCROLL FOR NEXT