पुणे

चालकाला लुटल्याप्रकरणी निघोजे येथे दोघांना अटक

CD

चाकण, ता. २ : निघोजे (ता. खेड) येथे कंटेनर चालकाला लुटल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अविनाश सुरेश मोरे (वय २०, मूळ रा. पवनानगर, ता. मावळ, सध्या रा. निघोजे), अजय तुळशीराम गवळी (वय १९, मूळ रा. मालेगाव, जि. वाशीम, सध्या रा. निघोजे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
निघोजे येथे ३० एप्रिल रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कंटेनरचालक रामअधिनभिलमन यादव (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) हा कंटेनर घेऊन महाळुंगे बाजूकडे जात होता. त्यावेळी आरोपी कंटेनरच्या समोर उभे राहिले. त्यामुळे यादव यांनी कंटेनर बाजूला घेतला व खाली उतरले. त्यावेळी आरोपींनी त्यांना दमदाटी केली. तसेच, त्यांच्या शर्टच्या खिशातील आठशे रुपये रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच, कंटेनरच्या पुढील काचेवर दगड फेकून मारले व नुकसान केले. त्यानंतर आरोपी निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT