पुणे

बोगस मतपत्रिकाप्रकरणी चाकणमध्ये चौकशी सुरू

CD

चाकण, ता. ४ : येथील श्री साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बोगस मतपत्रिका आढळल्या होत्या. त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती चाकण (ता. खेड) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
त्यामुळे मतमोजणी स्थगित केली होती. त्यानंतर मतपेट्या पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या होत्या. याबाबत काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर बराच गोंधळ झाला होता. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या बोगस मतपत्रिका आढळल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांच्या वतीने या मतदानातील बोगस मतपत्रिका घोटाळ्याची
चाकण श्री साईबाबा पतसंस्थेचे २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी मतमोजणी सुरू होती. मात्र, मतमोजणी सुरू असताना बोगस मतपत्रिका आढळल्या होत्या. त्यामुळे काही उमेदवारांच्या आक्षेपानुसार मतमोजणी झाली नाही. सुमारे पाचशे बोगस मतपत्रिका बॅगमध्ये होत्या. त्यानंतर बराच वेळ वाद समर्थक व विरोधक उमेदवार यांच्यात तसेच निवडणूक अधिकारी यांच्यात झाला. पहाटे चारपर्यंत वाद सुरू राहिला. त्यानंतर मतपेट्या पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितावर काही उमेदवारांनी आरोप केले.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सनील महादेव धादवड यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलमधील उमेदवारांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. उमेदवारांना पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ४) चौकशीसाठी बोलविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT