पुणे

चाकण बसस्थानक बनले खासगी वाहनतळ

CD

चाकण, ता. १० ः येथील एसटी बसस्थानकात सध्या एसटी बसचे येण्या जाण्याचे प्रमाण कमी आणि वाहनतळावर खासगी वाहनांची गर्दी जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. याकडे महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
चाकण (ता. खेड) येथील एसटी बसस्थानक बांधा, वापरा, हस्तांतरित करा या बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेले आहे. या बसस्थानकात व्यापारी गाळे मोठ्या प्रमाणात आहेत. दूरवरच्या एसटी बस या बसस्थानकात येत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. येथे वाहतूक नियंत्रक आहे. एसटी बसची ये-जा कमी असल्याने येथे खासगी वाहनांचा वाहनतळ मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा वाहतूक नियंत्रक अनेक दुचाकीस्वारांना, वाहनचालकांना येथे वाहने लावू नका, असे सांगतात. परंतु, कोणी ऐकत नाही असेही वास्तव आहे. त्यामुळे या बस स्थानकाला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. एसटी बसला वळण घेताना या वाहनतळामुळे अडचणी येत आहे. या बस स्थानकात सोयी, सुविधांचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली असून कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई केली पाहिजे, अशी काँग्रेसचे खेडचे ज्येष्ठ नेते भास्कर तुळवे मागणी यांनी केली आहे.
याबाबत वाहतूक नियंत्रक रोहिदास सातकर म्हणाले, मी अनेक दुचाकीस्वार, कार चालक यांना सांगतो येथे वाहने लावू नका. पण कोणी ऐकत नाही तरीही येथे वाहने लावतात. त्यामुळे या बसस्थानकाला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. लोकांना किती वेळा सांगितले तरी काही लोक दमदाटी करतात. काहीजण दडपशाही करतात आणि वाहने लावून निघून जातात. पोलिसांना सांगितले तरी काही होत नाही.
-५३८१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT