Bail  Sakal
पुणे

Pune Crime : तोतया पत्रकाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

तोतया पत्रकाराने बातमी देण्याच्या व तुमची तक्रार करतो तसेच खोट्या बातम्या करून संबंधिताची बदनामी केली.

सकाळ वृत्तसेवा

चाकण : येथील (ता. खेड) एका तोतया पत्रकारावर विनयभंग व धमकीची, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तक्रार एका वरिष्ठ शासकीय महिला अधिकाऱ्याने केली होती. त्यानंतर आरोपी आशिष ढगे (सध्या. रा. खराबवाडी, ता. खेड) याच्यावर गेल्या दहा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो आरोपी फरारी आहे. हा तोतया पत्रकार मूळ नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस या गावचा आहे.

तोतया पत्रकार आरोपी ढगे हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी गेला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड न्यायालयाने काल ता. १९ ला फेटाळला असल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

या तोतया पत्रकाराने बातमी देण्याच्या व तुमची तक्रार करतो तसेच खोट्या बातम्या करून संबंधिताची बदनामी केली. याप्रकरणी काही शिक्षण संस्था, काही राजकीय व्यक्ती काही पोलिस अधिकारी, कर्मचारी, काही नोकरदार, काही कंपन्या, काही शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांनाही त्याने आर्थिक गंडा घातला आहे.

काही शिक्षकही या तोतया पत्रकाराच्या धमकीला व बातमीला बळी पडले आहेत. त्यातून त्याने अनेक आर्थिक तडजोडी केल्याचे समोर येत आहे. या तोतया पत्रकाराने काही पोलिस अधिकाऱ्यांचे,पोलिसांचे नाव सांगून काहींना फसवले आहे, अशाही ऑडिओ क्लिपसमोर येत आहेत.

दरम्यान, वरिष्ठ शासकीय अधिकारी पीडित महिलेने या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, तोतया पत्रकाराने कोणाची काही आर्थिक फसवणूक केली असेल कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर त्यांनी चाकण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा आणि तक्रार करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT