पुणे

मेदनकरवाडीचा खंडोबा दोन पानात लेख फोटो घेणे

CD

खेड तालुक्यातील चाकण जवळचे मेदनकरवाडीचे खंडोबा देवस्थान प्रतिजेजुरीचा खंडोबा देवस्थान म्हणून समजले जाते. या देवस्थानची यात्रा दरवर्षी माघी पौर्णिमेला भरते. या यात्रेत बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो. हा बारा गाड्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मेदनकरवाडी येथील तीर्थक्षेत्राला ‘क’वर्गाचा दर्जा राज्य शासनाने दिलेला आहे. मेदनकरवाडी खंडोबा देवस्थान ट्रस्ट येथे भाविक भक्तांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संकेत रामदास मेदनकर यांनी सांगितले.

मेदनकरवाडी येथील खंडोबा देवस्थान हे पुरातन देवस्थान आहे. या देवस्थानाला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. या देवस्थानाची दरवर्षी माघी पौर्णिमेला यात्रा भरते. या माघी पौर्णिमा यात्रेच्या दहा दिवस अगोदर मानाच्या गाड्यांचे विधिवत पूजन केले जाते. त्यानंतर दहा दिवसांनी माघी पौर्णिमा यात्रा भरते. या यात्रेत बारा गाडे भाविक, भक्तांकडून देवाच्या मानकऱ्यांकडून ओढले जातात. हे गाडे एक ते दीड किलोमीटर अंतरावर जातात तेथे विधीवत देवाला नैवेद्य दाखविला जातो. पूजा केली जाते त्यानंतर गाडे थांबतात, अशी देवाची आख्यायिका आहे. हे देवस्थान पुरातन आहे. या देवस्थानावर शिवाजी महाराज चाकणच्या किल्ल्यावर आलेले असताना त्यांनी मेदनकरवाडी खंडोबाला भेट दिली, असेही काही लोकांकडून सांगण्यात येते. मेदनकरवाडी (ता. खेड) येथील पुरातन मंदिराचे बांधकाम १९३२ मध्ये एका दानशुराने केले. या मंदिराचे बांधकाम कौलारू पद्धतीचे आहे. वेगवेगळ्या रंगीत फरशा असलेले अप्रतिम असे बांधकाम आहे. या मंदिराला आणलेल्या फरश्या या पर देशातून आणलेल्या आहेत. या मंदिराच्या ट्रस्टची स्थापना स्वर्गीय रामदास मेदनकर (माजी सरपंच) यांनी केलेली होती. त्यांच्या प्रयत्नानंतर या देवस्थानाला ‘क’ दर्जा मिळाला. मेदनकरवाडी येथील खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान समजले जाते. माघी पौर्णिमेच्या यात्रेच्या अगोदर दहा दिवस मानाच्या गाड्यांचे पूजन मंदिरासमोर केले जाते. त्यावेळी दहा दिवस परिसरातील भाविक मानाच्या गाड्याला सकाळी आवर्जून पाणी घालतात. देवाची पूजा करतात. माघी पौर्णिमा यात्रेला बगाडाची,बैलांची, बैलगाड्यांची मिरवणूक वाजंत्री, वाद्यांच्या गजरात मोठ्या प्रमाणात होते. यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संकेत मेदनकर यांनी सांगितले की, ‘मेदनकरवाडी माघी पौर्णिमा यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. भाविकांना दरवर्षी व्यवस्थित पद्धतीने सोयीसुविधा देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रयत्न करते. ट्रस्टच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येणार आहे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.’


श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट
या देवस्थान ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय रामदास मुरलीधर मेदनकर (माजी सरपंच,मेदनकरवाडी),
अध्यक्ष अँड.संकेत रामदास मेदनकर,
उपाध्यक्ष सदाशिव रामभाऊ मेदनकर,
सचिव राहुल विठ्ठल भुजबळ
खजिनदार मयूर दत्तात्रेय मेदनकर
विश्वस्त रोहिदास तुळशीराम मेदनकर
विश्वस्त उमेश शिवाजी मेदनकर
विश्वस्त शंकर हरिभाऊ भुजबळ
विश्वस्त ज्ञानोबा रामचंद्र मेदनकर
विश्वस्त श्रीमती सुरेखा रामदास मेदनकर
विश्वस्त महेंद्र अशोक मेदनकर
विश्वस्त शिवाजी परशुराम मेदनकर

फोटो
आमदार दिलीप मोहिते. ,
.बारा गाड्यांचा फोटो

CHN23B05871,CHN23B05872, CHN23B05875, CHN23B05870,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT