पुणे

चाकणचे खेळाडू मांडतायत व्यथा

CD

हरिदास कड : सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. १० : शहराची लोकसंख्या दोन लाखांवर पोहचलेली असताना चाकण शहरात शासकीय क्रीडासंकुल नाही. त्यामुळे खेळाडूंनी सराव करायचा कोठे? हा प्रश्न निर्माण होत आहे. चाकण शहरात क्रीडासंकुल होणे गरजेचे आहे.

चाकण (ता. खेड) येथे गेल्या सात वर्षापासून नगरपरिषद अस्तित्वात आहे. क्रीडा संकुल होण्यासाठी कोणत्याही नेत्याने पुढाकार घेतलेला नाही. देशी, ग्रामीण, निमशहरी भागातील खेळाडूंची क्रीडाविषयक कौशल्य विकसित होण्यासाठी तसेच त्यांना सरावासाठी दर्जेदार क्रीडासंकुले विकसित होणे गरजेचे आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. चाकण शहरातील मुला, मुलींना मैदानी खेळांची मानसिकता तयार करण्यासाठी त्यांना क्रीडासंकुलांची खरी गरज आहे. क्रीडाविषयक सुविधांचा लाभ घेऊन स्वतः विकसित होणे हे विद्यार्थी तसेच प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दुर्गम, ग्रामीण भागातील, निमशहरी मुला मुलींसाठी क्रीडासंकुल होणे अधिक महत्त्वाचे आहे.

शहरात क्रीडासंकुल नसल्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या सोयीनुसार शाळेतील मैदानावर सराव करतात. मैदानावर विविध सोयी सुविधा क्रीडा संकुलासारखी उपलब्ध नसल्याने त्यांच्या सरावावर तसेच खेळावर मर्यादा येते. पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे खेळ बंद ठेवावे लागतात. विविध शाळांची खासगी मैदाने ही मोठी नसतात छोट्या मैदानावरच अनेक विद्यार्थ्यांना सराव करावा लागतो. अनेक शाळा सुट्टीच्या दिवशी बंद असतात त्यामुळे त्या शाळांची खासगी क्रीडांगणही मुलांना, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुट्ट्याच्या दिवशी मिळत नाही.

चाकण शहरात क्रीडा संकुल होणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा नाही. तसेच उद्यान करण्यासाठी ही जागा नाही. त्यामुळे क्रीडा संकुल, उद्यान हे कागदावरच अडकले आहेत. शासनाने क्रीडा संकुल व उद्यानासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास तसेच जागा उपलब्ध करून दिल्यास चाकण शहरात क्रीडा संकुल व उद्यान नक्की होईल.
- संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद.

चाकणमध्ये क्रीडासंकुलच्या बाबतीत शासनाची उदासीनता आहे. महाविद्यालयातल्या ग्राउंडवर
खेळासाठी सोयी, सुविधा उपलब्ध नसतात. तरीही तेथे खेळ खेळावे लागतात. त्यामुळे खेळाडूंची फार गैरसुविधा होते. त्यावरही मात करून खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकतात हे खेळाडूंचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे कौशल्य आहे.
- ज्योती खुडे, राष्ट्रीय खेळाडू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT