पुणे

नाणेकरवाडीत पतीकडून पत्नीला हातोड्याने मारहाण

CD

चाकण, ता. १६ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीच्या डोक्यात, हातावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हातोडीने मारहाण केली. या घटनेत सुरेखा आडे (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी विश्वंभर हारजू आडे (वय ३६) याला अटक केली आहे.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी माहिती दिली की, हा प्रकार बुधवारी (ता. १६) रात्री दोन ते तीनच्या सुमारास राहत्या घरात घडला. आरोपी विश्‍वंभर याने पत्नी सुरेखा हिला हातोडीने डोक्यावर, हातावर, कानावर, डोळ्यावर जबर मारहाण केली. त्यामुळे सुरेखा ही गंभीर जखमी झाली. तिच्या कानातून, डोक्यातून रक्त येत होते. जखमी अवस्थेत ती घरात पडून होती. मारहाण केल्यानंतर विश्‍वंभर फरारी झाला होता. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सुरेखा हिच्या नातेवाइकांना दिली. या प्रकरणी सुरेखा हिचा भाऊ गजानन चव्हाण यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी विश्‍वंभर याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Pune News : सावरकरांच्या सुटकेसाठी काँग्रेसने केला होता ठराव; सात्यकी सावरकरांची न्यायालयात माहिती, सात जुलैला होणार उलटतपासणी

जय भीम चित्रपटाची पुनरावृत्ती? राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेप, काय आहे बेग्या पवार प्रकरण?

'लोक माझ्या पाया पडायला येतात' देवदत्त नागेने सांगितल्या प्रेक्षकांच्या भावना, म्हणाला... 'मी त्यांना जेजुरीच्या दिशेनं हात...'

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT