पुणे

आंब्याच्या बागेमुळे तरुण बनला लखपती

CD

चाकण, ता.२: कडाचीवाडी (ता. खेड) येथील तरुण शेतकरी मल्हारी ऊर्फ बाळासाहेब कड यांनी दोन एकर जमिनीमध्ये चारशे केशर आंब्याची झाडे लावलेली आहेत. गेल्या तीन वर्षापासून ते आंब्याचे उत्पादन घेत आहेत. या वर्षी सेंद्रिय खताच्या जोरावर त्यांनी चार टनांचे उत्पादन मिळविले. त्याच्या विक्रीतून चार लाख रुपये उत्पन्न मिळाले आहेत.

कडाचीवाडी येथे कडे यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये चारशे आंब्याची झाडे गेली चार वर्षांपूर्वी लावली होती. त्यांना चौथ्या वर्षी त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालेले आहे. एका आंब्याच्या झाडाला अगदी बाराशे आंबे लागलेले आहेत. यावर्षी आंब्याच्या बागेपासून सुमारे चार टन (चाळीस हजार किलो) आंबे निघाले. केशरी आंबा सरासरी शंभर रुपये किलोने बाजारात विकला जातो. पुढील काळात या आंब्याच्या बागेपासून कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे. आंब्याचा हंगाम फक्त एक महिन्याचा असतो. सेंद्रिय खतावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. घरगुती पद्धतीने कोणत्याही रसायनाचा वापर न करता आंबे पिकविले जातात. त्यामुळे आंबे खरेदी करण्याकडे स्थानिक परिसरातील तसेच पुणे,पिंपरी -चिंचवड परिसरातील लोकांचाही कल आहे.
दरम्यान, आंब्याच्या बागेचे संवर्धन करण्यासाठी तसेच जतन करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती त्यांना मदत करतात .यामध्ये मुलगा साई, वडील, पत्नी, आई, मुलगी त्यांना मदत करतात.
सेंद्रिय खतावर हा आंबा उत्पादित केला जातो. घरगुती पद्धतीने गवतावर पिकवला जातो. त्यामुळे त्याची चव अतिशय गोड आहे. आंब्याला चाकण व परिसरातील बाजारात अगदी पुणे ,पिंपरी चिंचवड परिसरातही मागणी आहे. काही लोक आंबे खरेदी करण्यासाठी घरीही येतात.त्यामुळे आंब्याची पेटी बनवून ती विकली जाते. कुठे बाजारात आंबा विक्रीसाठी न्यावा लागत नाही.
- मल्हारी कड, आंबा उत्पादक

07060

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT