चाकण, ता. २ : भोसे (ता. खेड) येथे कृषिदिन विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी, शिक्षक, कृषी कन्यांनी, ग्रामस्थांनी उत्साहात साजरा केला.
कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतीक म्हणून पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, ग्रामपंचायत भोसे व मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय आंबी येथील कृषिकन्यांनी कृषी दिनानिमित्त मॉडर्न प्रशालेतील विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा दिल्या तसेच वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिला.
कृषी दिन हा कृषिप्रधान भारत देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला पाहिजे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी, असे बहुमूल्य मार्गदर्शन कृषिकन्या आदिती रोहोम, सईश्वरी साखरे, पायल शेळके, स्नेहल कदम, विशाखा कारभळ यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना केले. यावेळी भोसे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक, विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
07180
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.