पुणे

चाकण ते काळुस रस्त्याचे काम अखेर मार्गी

CD

चाकण, ता. ९ : `चाकण ते काळुस रस्त्याचे काम अडकले वादात’, असे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ते काम पूर्ण करण्यात आले.

येथील चाकण- राक्षेवाडी-काळुस या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून काही लोकांत वाद निर्माण झाला. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला. त्यामुळे चाकण-राक्षेवाडी-काळुस या मार्गाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी नागरिक, विद्यार्थ्यांमधून करण्यात आली. यासंदर्भात ‘सकाळ’ने बातमी देऊन पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच कामगार, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
चाकण -राक्षेवाडी -काळुस हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हा मार्ग मोठ्या वर्दळीचा आहे. या मार्गावर चाकण महाविद्यालय, इतर शाळा, विद्यालय व इतर वस्ती मोठी आहे. या मार्गावरून शेती मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक चाकण बाजारात होते. गेल्या दोन महिन्यांपासून काही वादामुळे मार्गाचे दीडशे फुटाचे काही काम रेंगाळले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने काही मार्गाचे काम केले होते. परंतु फक्त दीडशे फूट मार्गाचे काम रेंगाळलेले होते. हे काम तिथे काहीजणांच्या जागेची मालकी सांगण्यात येत होती. तसेच नऊ मीटर रुंदी ऐवजी सात मीटर रुंदी करावी, हा ही प्रश्न होता. त्यामुळे हे काम रेंगाळले होते. काही लोकांतील वादामुळे हे प्रकरण अगदी पोलिस ठाण्यापर्यंत गेलेले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संतोष पवार यांनी सांगितले की, हे काम काही वादामुळे रखडले होते, ते पूर्ण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT