चाकण, ता. ३० : तळेगाव- चाकण- शिक्रापूर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, या मागणीसाठी चाकणच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
याबाबत शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे पुणे -नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी माहिती दिली की, चाकण- तळेगाव-शिक्रापूर या मार्गाच्या कामासाठी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध प्रक्रिया सुरू केली होती. या रस्त्याचा जमिनीवरील चार लेन व उन्नत मार्गावर चार लेन, असा एकूण आठ लेनचा उन्नत मार्ग संपूर्ण उड्डाणपूल ५४ किलोमीटरमध्ये आखला होता. ही निविदा प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर होईल, अशी अपेक्षा होती, परंतु ती झाली नाही. निवडणुकीनंतर मागील दोन महिन्यांपासून हा रस्ता राज्य शासनाने नवीन तयार केलेल्या एमएसआयडीसीकडे वर्ग केला अशा बातम्या येऊ लागल्या. तसेच, चर्चा रंगल्या. एमएसआयडीसीच्या वतीने हा रस्ता करताना अजून वेळ जाऊ शकतो. कारण, पुढील महिन्यापासून राज्यातील निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे, अशी विनंती करण्यासाठी या परिसरातील उद्योजक, तरुण पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय नेते मंडळी यांनी गडकरी यांची भेट घेऊन कामाबाबत चर्चा केली. या रस्त्याचे काम लवकर व्हावे, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.