चाकण, ता.५ : चाकण (ता.खेड) येथील महात्मा फुले बाजारात शुक्रवारी (ता. ४) कर्नाटकामधील बेळगाव येथून सुमारे पन्नास टन रताळ्याची आवक झाली. नवरात्रोत्सवामुळे
बाजारात ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. घाऊक बाजारात रताळे प्रतिकिलो ३० ते ४० तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपयांनी विकले गेले.
राज्यातील सातारा व इतर भागातील तसेच गुजरात राज्यातील रताळ्यांच्या पिकाला यावर्षी अधिक पावसाने फटका दिल्याने काढणी रखडली आहे तसेच काही सडून नुकसान झाले. त्यामुळे रताळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपवासाचा एक पदार्थ म्हणून रताळ्याला मोठी मागणी आहे. परंतु पावसाने यंदा रताळी पिकाचे मोठे नुकसान केल्याने हा हंगाम वाया गेला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवापूर्वी तसेच नवरात्रात मोठ्या प्रमाणात रताळ्याची काढणी होते. यावर्षी लाल मातीतील पारंपरिक वाणाचे हे कंदमुळ चवीला रूचकर आहे. त्यामुळे सातारा परिसरात तसेच गडहिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर, पुणेच्या काही भागात रताळ्याचे पीक घेतले जाते.
यावर्षी रताळ्याचे पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणात अतिपावसाने घटले आहे. त्यामुळे राज्यात अल्प प्रमाणात उत्पादन निघत आहे.पावसाने रताळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका दिला असल्याचे व्यापारी रवींद्र बोराटे, महेंद्र गोरे, कुमार गोरे, संजय वहिले, आबा गोरे, भानुदास बुट्टे, ज्योतिबा गोरे, लहू कोळेकर यांनी सांगितले.
07522
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.