पुणे

सोयाबीनचे बाजारभाव घसरणार की वाढणार?

CD

चाकण, ता. ४ : देशात व राज्यात सध्या सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा घसरले आहेत. केंद्र सरकार सोयाबीनच्या किमती वाढवण्यासाठी खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. देशात कच्चे पामतेल, सोयातेल, सूर्यफूल तेलाच्या आयातीवर साडेसत्तावीस टक्के आयात शुल्क आहे तसेच रिफाइंड तेलाच्या आयातीवर पस्तीस टक्क्यांवर आयात शुल्क आहे. यामुळे राज्यात सोयाबीनचे दर वाढणार की अजून घसरणार अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

राज्यात सोयाबीनची प्रतिकिलो ४८ रुपये ९२ पैसे या हमीभावाने शासनाने खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये तेलबियांचे दर वाढावेत यासाठी खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वीस टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. त्यानंतरही सोयाबीनचे बाजारभाव वाढले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा आयात शुल्क वाढवण्याची शक्यता आहे, असे चित्र आहे. सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा साधारणपणे आठशे, नऊशे ते एक हजार रुपयांनी कमी आहेत. केंद्राने आयात शुल्क वाढवले तर सोयाबीनचे दर खरच वाढतील का ही भीतीही व्यक्त होत आहे. सोयापेंडच्या दरात मोठी घसरण होत आहे. देशात पशुखाद्यासाठी डीडीजीएसचा पुरवठा वाढल्यामुळे सोयापेंडच्या किमती घसरत आहेत.


सध्या बाजारात सोयाबीनचे भाव हे व्यापाऱ्यांकडे ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोला आहे ते हमीभावापेक्षा ९ ते १० रुपयांनी प्रतिकिलोला कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र वाढवली पाहिजेत.
- बाजीराव जाधव, सोयाबीनचे उत्पादक

सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी ही एप्रिल, मे महिन्यापर्यंत सुरू ठेवली पाहिजे. त्यामुळे छोट्या व मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे उत्पादन खर्चातून किमान सुटका होईल.
- चंद्रकांत परदेशी, सोयाबीनचे उत्पादक

खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी केल्यानंतर ते ऑइल मिलला विकतात. व्यापारी सोयाबीन ३८ ते ४० रुपये दराने प्रतिकिलोला विकत घेतात. हमीभावापेक्षा हा मोठा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सोयापेंड व सोयातेलचे बाजारभाव घसरल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोया पेंड ही बाजारात ३० ते ३२ रुपये प्रतिकिलोंनी विकली जात आहे. सोयापेंडचे भाव घसरल्याने सोयाबीनचे भाव घसरले आहेत.
- किशोर नहार, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT