पुणे

चाकण अवैध रिक्षांचा सुळसुळाट

CD

चाकण, ता. २५ : चाकण (ता. खेड) येथील पुणे- नाशिक महामार्गावर तळेगाव, आंबेठाण, माणिक चौक, एमआयडीसी चौकात अगदी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अवैध रिक्षाचालक इतर वाहनचालकांवर दादागिरी करतात. अवैध रिक्षांच्या चौका, चौकातील सुळसुळाटामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले आहेत.

अवैध रिक्षामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. रिक्षाचालकांवर कोणाचा वरदहस्त आहे व या रिक्षांवर कोणाची लाखो रुपयांची हप्तेगिरी चालते असाही सवाल नागरिकांना पडला आहे.
तळेगाव चौकात अवैध रिक्षा मोठ्या प्रमाणात भोसरी-चाकण, चाकण- राजगुरुनगर, चाकण- तळेगाव चाकण- शिक्रापूर या मार्गावर रोज ये-जा करतात. या मार्गावर सुमारे पाच हजारावर रिक्षा आहेत. या रिक्षातून नियमांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान, रिक्षांना स्वतंत्र ‘पार्किंग झोन’ नसल्याने रिक्षा रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने लावल्या जातात असे काही रिक्षाचालकांमध्ये म्हणणे आहे.
दरम्यान, पुणे प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या नोंदी असलेल्या काही रिक्षा आहेत तर काही बनावट नोंदी असलेल्याही आहेत.

दृष्टिक्षेपात सध्याची परिस्थिती
१. मराठवाडा, विदर्भ या भागातील मोठ्या प्रमाणात रिक्षा अवैधरीत्या चालतात.
२. रिक्षावर पोलिसांनी कारवाईची थोडीशी मलमपट्टी केली जाते.
३. दंडात्मक कारवाई करूनही पुन्हा, पुन्हा त्या रिक्षा चौकात येतात.
४. रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी चालते.
५. काही रिक्षाचालक गुन्हेगार असल्याने गुन्हेगारीचे फोफावत आहे.
६. इतर जिल्ह्यातून गुन्हे करून आल्यानंतर ते या परिसरात रिक्षा चालवतात.
७. व्यवसायिकांना, महिला, तरुणी, कामगारांना रिक्षाचालकांची सहन करावी लागते दादागिरी.
८. रस्त्यातच रिक्षाचालक, प्रवासी व इतर यांच्यात रस्त्यावर हाणामाऱ्या होतात

ज्या रिक्षा अवैधपणे रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावल्या जातात.त्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली जाते.स्थानिक वाहतूक विभागाने अधिक लक्ष द्यावे.
- पवन नवाडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पिंपरी-चिंचवड


‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’
रिक्षाबरोबर इतर वाहने कार धावतात त्यांच्याकडूनही एक हजार रुपये दर महिन्याला हप्ता घेतला जातो. हप्ता गोळ्या करण्याचे काम काही रिक्षा चालक, पोलिसांचे काही लोक करतात. काही संघटनांचे लोकही बळजबरी, दमदाटी करून हप्ता गोळा करतात. यामध्ये काही डमी पोलिस म्हणूनही वावरतात. काही पोलिस, काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याही अनेक रिक्षा आहेत. काहींनी रिक्षा भाड्याने लावून पैसा कमावण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’ अशी अवस्था आहे.

08292

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT