पुणे

निर्यात शुल्क हटविले, बाजारभाव वाढणार कधी?

CD

चाकण, ता. ३० : कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. पण बाजारभाव प्रत्यक्षात वाढणार कधी होणार? निर्यात शुल्क कायमचे कमी व्हावेत तसेच शुल्का बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी तसेच निर्यातदार यांची मागणी आहे.

राज्यातील विविध प्रमुख बाजारात गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या भावात प्रतिकिलोला दहा ते बारा रुपयांनी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव प्रतिकिलोला अगदी दहा ते पंधरा रुपयांवर आले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो. केंद्र सरकारचे कांदा विषयक निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी हानिकारक आर्थिक नुकसानीचे आहे असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

केंद्राने कांदा निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी व प्रत्यक्षात निर्यात वाढावी, अशी शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची मागणी आहे असे निर्यातदार व्यापारी प्रशांत गोरे पाटील, अडते, व्यापारी, खेड बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, व्यापारी विक्रम शिंदे, जमीरभाई काझी, यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख अशा चाकण या बाजारातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते. निर्यातीसाठी कांदा या बाजारात व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांच्याकडून खरेदी केला जातो. सध्या या बाजारात कांद्याची आवक वाढते आहे. केंद्राने निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून झाली तरी कांद्याचे बाजारभाव खऱ्या अर्थाने एप्रिल, मे महिन्यात वाढतील अशी शक्यता शेतकरी व्यापाऱ्यांना वाटते आहे.
- बाळासाहेब गायकवाड, व्यापारी, चाकण

कांद्याचे घाऊक बाजारातील भाव (कमाल व किमान प्रतिकिलो)
मुंबई.......१० ते १९
नाशिक.......१० ते १५
चाकण.......१० ते २०.
अहिल्यानगर.......१० ते १५
संभाजीनगर.......११ ते १५
सोलापूर.......१३ ते २२
कोल्हापूर.......१३ ते १९

प्रत्यक्षात बाजारभाव वाढीची प्रतीक्षा
राज्यातील विविध बाजारात सरासरी आवक पाच ते दहा हजार, पंधरा हजार क्विंटल होत आहे. आवक मोठी आहे. कांद्याची काढणी सध्या राज्यात जोरात सुरू असल्याने आवक वाढते आहे. आवक वाढल्याने भाव घसरत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. देशांतर्गत कांद्याची विक्री सध्या होत असली तरी एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटवले जाणार असले तरी प्रत्यक्षात याचा परिणाम बाजारभाव वाढीची प्रतीक्षा शेतकरी, निर्यातदार व्यापाऱ्यांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT