चाकण, ता. ४ : खेड तालुक्यातील काळूस, वाकी, भाम, भोसे येथील अष्टरच्या नंदनवनातून अस्टरची फुलशेती हद्दपार झाली आहे. मुंबईतील दादर मार्केटमध्ये तालुक्यातून एक वेळी पन्नास ते शंभर ट्रक अस्टरच्या फुलांची विक्री होत असे. मात्र सध्या मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे फुलशेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. यामुळे गेल्या पंचवीस, तीस वर्षांपूर्वीचे हे दृश्य फूल उत्पादनाअभावी भकास दिसू लागले आहे.
चाकण परिसरातील काळूस, वाकी, भाम, रासे, भोसे, शेलगाव, शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी दौंडकरवाडी, वडगाव घेणंद, सोळू, धानोरे, मरकळ व इतर परिसरात गेल्या पंचवीस, तीस वर्षांपूर्वी अस्टर फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जायचे. चाकण, मुंबई, दादर तसेच पुणे येथे फुलांच्या पाट्या (डाग) पाठवणारे अनेक हुंडेकरी असायचे. हुंडेकरी रात्री आठ ते दहा, अकराच्या सुमारास या गाड्या मुंबई दादर येथे निघायच्या. सुमारे पन्नास ते शंभर ट्रक चाकण परिसरातून अस्टरच्या फुलांच्या जायच्या. पहाटे किंवा सकाळी त्या मुंबईत पोहोचायच्या तेथील मार्केटमध्ये अस्टरच्या फुलांची विक्री व्हायची.
क्वचित एखादा शेतकरी फुलवितो अस्टर
काही शेतकरी अगदी पाच, दहा ते वीस एकरपर्यंत अस्टरच्या फुलांची शेती करायचे. शेकडा जुड्यांना त्यावेळेस अगदी दहा, पन्नास रुपयांपासून शंभर, सव्वाशे, दीडशे रुपयापर्यंत भाव मिळायचा. अधिक भाव मिळाला की काही शेतकरी अगदी लखोपती ही व्हायचे. क्वचित एखादा शेतकरी अस्टरची शेती फुलविताना दिसत आहे, असे शेतकरी संपत पवळे यांनी सांगितले.
अस्टर फुलांच्या जाती
* फुले गणेश व्हाइट-पांढऱ्या रंगाची फुले
* फुले गणेश पिंक-आकर्षक गुलाबी रंगाची फुले
* फुले गणेश व्हायोलेट- गडद जांभळ्या रंगाची फुले
* फुले गणेश पर्पल-फिक्कट जांभळ्या रंगाची फुले
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, लग्न हंगाम या दिवसात अस्टर च्या फुलांना मोठी मागणी असायची. त्यावेळेस अगदी शंभर जुड्यांना शंभर, सव्वाशे, दीडशे रुपये बाजारभाव मिळाला तरी शेतकरी खूष व्हायचे. सध्या शंभर जुड्यांना दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव आहे. परंतु तो अत्यंत कमी आहे. मजुरीच्या व इतर खर्चाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हा भाव परवडत नाही.
- रामदास पवळे, शेतकरी
08329
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.