चाकण, ता. २६ : कांदा काढणीचा खर्च... मजुरीचा खर्च....कांदा बाजार समितीच्या आवारात नेण्याचा वाहतूक खर्च... अन् त्यात मिळणारा अत्यल्प बाजारभाव. यामुळे कांदा उत्पादकांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी आता कांदा थेट बांधावरच व्यापाऱ्याला विकण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यासह राज्यभरातील व्यापारीही बांधावर कांदा खरेदीला पसंती देत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती लगेच प्रतवारीनुसार प्रतिकिलो ११ ते १२ रुपये बाजारभावानुसार रोख पैसे मिळतात. वाहतूक, आडत, हमालीच्या खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांचा काहीअंशी फायदा होत आहे.
सध्या वाढलेले मजुरीचे दर, मजुरांचा अभाव, वाहतूक खर्च आदी आर्थिक खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बांधावरच कांदा विक्री केल्याने वाहतूक खर्चातून दिलासा मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून ठराविक मुदतीत तसेच कांदा विक्रीच्या वेळेस शेतकरी तत्काळ पैसे घेतात. सध्या कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. यामुळे वाढत्या उन्ह, लग्नसराईमुळे शेतकऱ्याने कांदे काढल्यानंतर कांदे प्रतवारी करून निवडण्यासाठी, पोत्यात भरण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कांद्याची शेतातच कांद्याची पात काढणी केलेल्या कांद्यावर टाकून तात्पुरती साठवणूक करत आहेत.
१. कांदा व्यापारी, निर्यातदार कंपन्या, व्यापारी शेतातच कांद्याची पाहणी करतात.
२. व्यापारी प्रतिनुसार बाजारभाव ठरवून स्वतः आपले मजूर, वाहतुकीसाठी ट्रक आणतात.
३. कांदे निवडून जागेवरच गाड्या भरून इतर राज्यात कांदा विक्रीसाठी पाठवतात.
४. यामुळे शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च, वाहतूक खर्च यामध्ये आर्थिक बचत होते
५. शेतकऱ्यांना रोख पैसे मिळतात. त्यामुळे अडत, हमालीचा खर्च ही वाचतो.
बाजार समिती पैसे मिळण्याची हमी
रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातच कांदे विक्रीला प्राधान्य दिले आहे. मात्र, यातून काही शेतकऱ्यांची फसवणूक होते. काही व्यापारी कांदा खरेदी करतात आणि पैसे लवकर देण्याचे आमिष दाखवून पुन्हा फिरकत नाहीत. पसार होतात. यासाठी बाजार समितीत कांदा विक्रीस आणल्यानंतर आर्थिक फसवणुकीला आळा बसतो तसेच पट्टीद्वारे योग्य बाजारभाव व पैसे मिळण्याची हमी असते, व्यापारी जमीरभाई काझी यांनी सांगितले.
कांद्याचे बाजारभाव पुढील काळात वाढतील की नाही हे सांगता येत नाही. बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकऱ्याला पैशाची हमी मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकरी बाजार समितीच्या आवारातच कांदा विक्रीस आणतात हेही महत्त्वाचे आहे.सरकारी धोरणामुळे कांद्याचे भाव घसरलेले आहेत.
- प्रशांत गोरे पाटील
राज्यातील विविध बाजारातील बाजारभाव (प्रतिकिलो रुपयांत)
नाशिक.............१० ते १२
अहिल्यानगर.............१० ते ११
चाकण.............१० ते ११
सोलापूर.............१० ते ११
छत्रपती संभाजी नगर.............१० ते ११
सातारा.............१० ते १२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.