पुणे

मेदनकरवाडीत मेफेड्रोन जप्त

CD

चाकण, ता. २६ : खेड तालुक्यातील भाम, संतोषनगर येथील एका तरुणाच्या स्कॉर्पिओ मोटारीमध्ये मेफेड्रोन हा अमली पदार्थ पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुषार मलीभाऊ कड (वय ३०) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केला.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी माहिती दिली की, पुणे- नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी (ता. खेड) येथील चाकण ग्रँड हॉटेलसमोर गुरुवारी (ता. २४) दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत मेफेड्रॉन सापडले. याप्रकरणी पोलिसांनी तुषार कड याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्याच्याकडील सत्तर हजार रुपयाचे मेफेड्रोन व गाडी, असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT