चाकण, ता. २७ : येथील पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाचे सांडपाणी वाहून जाण्याचे शून्य नियोजन केले. येथे चार महिन्यांपूर्वी जे सांडपाणी वाहिनीचे काम केले आहे. ते काम निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे चौकात पाणीच पाणी झाले. भर पावसात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या.
चाकण (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मार्गाच्या एका बाजूला चाकण नगरपरिषदेची हद्द आहे तर दुसऱ्या बाजूला नाणेकरवाडी ग्रामपंचायतीची हद्द आहे. तळेगाव चौकात मार्गावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी चाकण नगरपरिषदेने तसेच नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे सांडपाणी चक्क मार्गावर येते. त्यामुळे मार्ग पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरतात त्यातून दुचाकी, कार आदी वाहने चालवायची कशी हा प्रश्न वाहनचालकांना पडतो आहे. पाणी वाहून जाण्यासाठी सांडपाणी वाहिनी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली असली तरी ते काम अपूर्ण आहे ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप नागरिकांचा,कामगारांचा आहे. सांडपाणी वाहिनीतून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे पाणी मार्गावर येते व पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -शिक्रापूर, चाकण -तळेगाव मार्गावर काम करण्यासाठी सुमारे दहा कोटीचा निधी खर्च केला परंतु पहिल्याच पावसाळ्यात पाणी तुडुंब झाले. वाहने चक्क पाण्यात अडकतात अगदी तीन ते चार फुटांवर पाणी मार्गावर असते. त्यामुळे ठेकेदार कंपनीने नेमके काम काय केले असा सवाल नागरिक,कामगार, प्रवाशांचा आहे.
पुणे-नाशिक महा मार्गांवर तळेगाव चौकात पाणी साचते आहे. वाहने अडकतात याबाबत मी पाहणी करणार आहे तसेच नगरपरिषद प्रशासन व आम्ही चर्चा करून पाणी नेमके कसे काढायचे याबाबत प्रयत्न करणार आहे.
- दिलीप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता
पुणे- नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात पाणी वाहून जाण्यासाठी नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाने काही केलेले नाही. त्यामुळे पाणी अडले आहे. आम्ही वारंवार त्यांना सांगतो आहे पण कोणीही ऐकत नाही. नगरपरिषदेला सांगून कसातरी जेसीबी बोलावला आणि पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला.
- प्रकाश राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक विभाग
08555
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.