पुणे

चाकण वनविभागात पर्यावरणाची घातक हानी

CD

चाकण, ता. १ : येथील चाकण- आळंदी मार्गावर वनविभागाच्या हद्दीत मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात रासायनिक, तसेच घातक, प्लॅस्टिक कचरा टाकला जातो. जो वन्यजीवांना, तसेच पाळीव जनावरांना घातक आहे. कचरा टाकणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांची, पर्यावरण प्रेमींची आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे, असाही नागरिकांचा आरोप आहे.
चाकण (ता. खेड) वन विभागाच्या हद्दीत सुमारे एक हजार एकरवर वनक्षेत्र आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील आळंदी फाट्यापासून आळंदी बाजूकडे चाकण- आळंदी मार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूला चाकण वनविभागाची हद्द आहे. या मार्गावर अगदी कडेलाच काही कंपन्यांतील रासायनिक कचरा, तसेच हॉटेलमधील कचरा, घरगुती कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. हा कचरा वन्यप्राण्यांना, तसेच शेजारील गावांतील पाळीव जनावरांना घातक आहे. हा कचरा खाल्ल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चाकण वनविभागाच्या हद्दीतील जंगलात कडाचीवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे, चिंबळी, माजगाव, केळगाव भागातील जनावरे, शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी येतात. तसेच, रोटाई तळे, कोचाळे तळ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. कचरा या जागेवर टाकू नये, यासाठी वनविभाग प्रयत्न करत असले, तरी ते प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे जागोजागी चाकण- आळंदी वनविभागाच्या हद्दीत कचरा दिसतो. या मार्गावरील पुरातन रोटाई तळ्यात पाणी आहे. या पाण्यात देखील काही कंपन्या रसायन सोडतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक
म्हैस, गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या प्लॅस्टिकचा कचराही खातात. त्यामुळे त्यांच्या पोटात अनेक वेळा प्लॅस्टिक गेलेले आहे. शेतकऱ्यांना हे प्लॅस्टिक जनावरांची शस्त्रक्रिया करून काढावी लागतात, असे आदिवासी शेतकरी रामा ठाकर यांनी सांगितले.

याबाबत वनविभाग सातत्याने कारवाई करत आहे. या ठिकाणी काही कर्मचारी नेमलेले आहेत. परंतु, रात्रीच्या वेळी काहीजण हा कचरा टाकतात. वनविभागाच्या वतीने त्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. कोणी या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जे कचरा टाकताना दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- संतोष कंक, वनपरिक्षेत्राचे अधिकारी, चाकण (ता. खेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Khelna Project Palod : खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काटेरी झुडपांचा विळखा; सिंचन व्यवस्थेला धोका, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

SCROLL FOR NEXT