पुणे

चाकणला पालेभाज्यांच्या बाजारभावात वाढ

CD

चाकण, ता. १ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून रविवारी (ता. १) टोमॅटोची तीस टन आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला १० ते १८ रुपये बाजारभाव मिळाला. पावसामुळे शेती बागायती पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांचे बाजारभाव वाढले आहेत तर फळभाज्यांच्या भावात प्रतिकिलोला दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे.

बाजारात कांद्याची आवक सुमारे अडीच हजार क्विंटल झाली. त्यास प्रतिकिलोस किमान आठ तर कमाल चौदा रुपये बाजारभाव मिळाला. दिल्लीतून सुमारे पन्नास टन हिरव्या मिरचीची आवक झाली. तिला प्रतिकिलोला वीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला नव्वद ते शंभर रुपये बाजारभाव मिळाला. बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरवट पिवळ्या देशी मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. दिल्लीतून आलेल्या हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला वीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला. देशी पिवळ्या मिरचीला प्रतिकिलोला तीस रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी,सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
लसणाची आवक पंचेचाळीस क्विंटल झाली. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे. किरकोळ बाजारात बटाटा प्रतिकिलोला तीस रुपये बाजारभावाने विकला जात आहे.

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव (रुपयांत)
हिरवी मिरची-२० ते ३०, हिरवा वाटाणा-९० ते १००, भेंडी-४० ते ६०, टोमॅटो-१० ते १८, गवार-६० ते ८०, फ्लॉवर ३० ते ४०, कोबी १०, दुधी भोपळा १० ते २०, ढोबळी मिरची-५० ते ७०, आद्रक-३० ते ३५, तोंडले-३०, दोडका-४० ते ६०, वांगी-३० ते ४०, काकडी-३० ते २५, कारली ३० ते ४०.

कोथिंबीर, मेथी, शेपूच्या एक लाख जुड्या
चाकण बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपूच्या सुमारे एक लाखावर जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी १२ ते १५ रुपयांना विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी पंधरा, शेपूची १४ रुपयांना विकली गेली. पालकच्या दोन हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी सुमारे अठरा रुपयांना विकली गेली.


08582

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Khelna Project Palod : खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काटेरी झुडपांचा विळखा; सिंचन व्यवस्थेला धोका, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

SCROLL FOR NEXT