पुणे

पती-पत्नीला धमकावत साडेनऊ तोळे दागिन्यांची चोरी

CD

चाकण, ता. १५: वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील गारगोटे शिवारातील काळूस रोडवर असलेल्या एका घरात रात्री दोनच्या सुमारास सुरेश टोपे व त्यांची पत्नी हे दोघे झोपेत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप व आतमधील लाकडी दरवाजा तोडला व चार जणांनी घरात प्रवेश केला व पती, पत्नीला धमकावून झोपेतून उठवले घरातील साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ८५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी चार चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी ( ता.१३) रात्री दोनच्या सुमारास घडला. आरोपी चोरट्यांच्या हातामध्ये लोखंडी कोयते व लोखंडी विळे होते ते सर्वजण चांगल्या प्रकारे मराठी भाषा बोलत होते. त्यांचे वय अंदाजे २५ ते ३५, ४० वर्षाचे होते. उंची साडेपाच ते सहा फूट व सडपातळ बांध्याचा होता. तुला व तुझ्या पत्नीला आम्ही जिवे मारून टाकू. त्यावर सुरेश यांच्या पत्नीने तिच्याकडे असणारे सर्व सोन्याचे दागिने काढून चोरट्यांना दिले व सुरेश टोपे यांनी देखील त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून दिली. त्यानंतर चोरटे दोघांचे मोबाईल घेऊन बेडरूमला बाहेरून कडी लावून निघून गेले. त्यानंतर सुरेश टोपे व त्यांची पत्नी दोघे रात्रभर बेडरूम मध्येच बसले होते. दरम्यान, चोरीप्रकरणी सुरेश टोपे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Fort Security Breach : लाल किल्ल्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न, दिल्ली पोलिसांकडून ५ बांग्लादेशींना अटक

मुंबई हायकोर्ट सुट्टीवर आहे का? राज ठाकरेंवर याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

साेलापूर हादरलं! 'लग्न करतो म्हणून तरुणीवर अत्याचार'; विवाहासाठी विचारल्यावर टाळाटाळ, तरुणी गरोदर अन्‌ तरुण पसार

IndusInd Bank: एकामागून एक राजीनामे... हेराफेरी आणि 1,960कोटींचे नुकसान... अडचणीत असलेल्या बँकेला मिळाला नवीन सीईओ

Mohammed Siraj: इंग्लिश पत्रकाराचा खोचक प्रश्न, सिराजने संतापून दिले सडेतोड उत्तर; म्हणाला, जस्सी भाई...

SCROLL FOR NEXT