पुणे

कर्नाटकाचा तोतापुरी आंबा खातोय ‘भाव’

CD

चाकण, ता.२९: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (ता.खेड) येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता.२९)
येथील कर्नाटक राज्यातून सुमारे तीस टन कर्नाटकी तोतापुरी आंब्याची आवक झाली. त्यास मागणी वाढल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलोला पंचवीस तर किरकोळ चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळाला.

बाजारात भुईमुगाच्या शेंगांना प्रतिकिलोस किमान चाळीस ते कमाल पन्नास रुपये बाजारभाव मिळाला. राज्यातील इतर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. त्यास प्रतिकिलोला दहा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात फेकून दिला. तर एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास प्रतिकिलोला किमान दहा ते कमाल वीस रुपये बाजारभाव मिळाला. मध्यप्रदेश राज्यातील इंदोर, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तसेच गुजरात राज्यातून बटाट्याची १७५०क्विंटलची आवक झाली. इंदोर बटाट्याला प्रतिकिलोस २३ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
चाकण बाजाराच्या आवारात हिरव्या मिरचीची दिल्ली, बुलडाणा व इतर भागातून सुमारे ५० टन आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिकिलोला किमान ३५ ते कमाल ४५ रुपये बाजारभाव मिळाला.
घाऊक बाजारात मेथी, कोथिंबीरीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला १० ते १५ रुपये भाव मिळाला तर कोथिंबीरीच्या एका जुडीला ६ ते १० रुपये भाव मिळाला.
फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव (रुपयांत) - टोमॅटो : १० ते २०, कारली : ४० ते ५०, दोडका : ३८ ते ४८, भेंडी : ३० ते ६०, गवार : ६५ ते ७५, कोबी : १० ते १६, फ्लॉवर : १० ते १५, वांगी : ३५ ते ४५: काकडी : १५ ते २५, वालवर :७५ ते ८५, ढोबळी मिरची : ४० ते ६०, हिरवा वाटाणा : ११० ते १३०.


जळगावची भेंडी प्रतिकिलो ६० रुपये
जळगावातील शेतकरी विकास बोरसे यांनी भेंडी चाकण बाजारात विक्रीसाठी आणली होती. चाकणला घाऊक बाजारात भेंडीला ५० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला. भेंडीचे भाव सध्या पावसाने वाढत असल्याचे शेतकरी, व्यापारी ज्ञानेश्वर बनकर यांनी सांगितले.


08713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

Kamaltai Gawai : आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार की नाही? कमलताई गवईंनी केले स्पष्ट; म्हणाल्या- आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित पण...

Maharashtra government decision : महायुती सरकारचा मोठा निर्णय; राज्यात आता दुकानं, हॉटेल्ससह इतर अस्थापनं 24 तास उघडी ठेवता येणार!

Alandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर राज्यातील पहिली 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन

2 October Numerology 2025: 'या' मूलांकाच्या लोकांना पैसा मिळणार, प्रेमही फुलणार...; वाचा १ ते ९ अंकांसाठी दिवस कसा असेल?

SCROLL FOR NEXT