पुणे

वनमंत्री नाईकांच्या पुढे मांडल्या काळूसच्या शेतकऱ्यांनी समस्या

CD

चाकण, ता.१२: काळूस (ता.खेड) येथील शेतकऱ्यांनी मंत्रालय मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांची नुकतीच भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढपाळाच्या शेळ्या, मेंढ्याबिबट्या खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्या शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी वनमंत्री नाईक यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन तातडीने भरपाई द्या, असे आदेश दिले. अशी माहिती सुभाष पवळे यांनी दिली.
माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काळूस येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली. काळूस येथील शेतकरी विजय गायकवाड यांच्या तीन शेळ्या बिबट्याने नुकत्याच खाल्ल्याचे मंत्र्यांना सांगितले. शेतकऱ्याचे झालेली नुकसानभरपाई तातडीने मिळावी ही मागणी केली .या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री नाईक यांनी सकारात्मक उत्तरे देऊन मागण्या मान्य केल्या. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवळे, पदाधिकारी विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल अरगडे, संतोष खलाटे, भरत अरगडे, नवनाथ जाधव, सुरेश कौटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ram Shinde: हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड

Pune News: राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर; पुणे विभागात मुबलक पाणी, जोरदार पावसाने काही भागांत पूरस्थिती

Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शासनाची पुढची स्टेप, पालकमंत्री आबिटकरांनी कायदेशीर त्रुटी दूर करण्यावर दिला भर

संतापजनक! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर बलात्कार, किर्तनकार महिलेसह कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT