पुणे

कोंडीत अडकल्याने कामगाराला धोका

CD

चाकण, ता. १३ : पिंपरी चिंचवड, भोसरी, पुणे, तळेगाव दाभाडे, मावळ तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून येथे कामगार वर्ग येत असतो. ते बसने तर काहीजण दुचाकीने प्रवास करतात. या मार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातच मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कंपनीत पोहोचण्यास उशीर होत असल्याने ‘हाफ डे’ लागल्याने पगार कपातीचा फटकाही बसतो.
चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे पाच लाखांहून अधिक कामगार वर्ग काम करतो. सुमारे पंचवीस हजारावर बस कामगारांची ने-आण करतात. अनेक कामगार हे दुचाकीवरून कंपनीत जातात. कामगार वर्ग वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना कंपनीत वेळेवर जाणे शक्य होत नाही. दररोज अर्धा ते एक तास उशिरा पोहोचल्याचा परिणाम पगारावरही होतो आहे.

वाहतूक कोंडीमुळे कामगार कंपनीत अर्धा, एक तास उशिरा जातो त्यामुळे कार्ड पंचिंग वेळेवर होत नाही. यामुळे छोट्या मोठ्या काही कंपन्यांमध्ये कामगारांच्या वेतनातही कपात होते. शासनाने नवीन रस्ते केले पाहिजेत.
सदा अमराळे, अध्यक्ष, कामगार कृती समिती, राजगुरुनगर

वाहतूक कोंडीमुळे कंपनीच्या उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. कामगारांच्या बसेस वेळेवर पोहोचल्या नाही की उत्पादन साखळीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अनेक कंपन्यांना आपले टार्गेट पूर्ण करता येत नाही. त्यामुळे कंपनीचे व कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे.
योगेश वाके, उद्योजक

वाहतूक कोंडीचा मोठा फटका कामगार व कंपनीला बसत आहे. कामावर येताना तसेच कामावरून घरी जाताना अनेक कामगारांचे अपघात होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
जीवन येळवंडे, जीवन येळवंडे, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना

शासन असून नसल्यासारखे आहे. लोकप्रतिनिधी नेते काहीच करत नाही. वाहतूक कोंडीत कामगारांचे जीव जात आहेत त्याला जबाबदार कोण आहे. वाहतूक कोंडी ही कामगारांच्या जिवावर उठलेली भीषण समस्या आहे.
कैलास ढोकले, कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा की चोरांची चंगळ? मोबाईल अन् सोन्याचे दागिने गायब, लुटमारीचा आकडा वाचून व्हाल थक्क

Latest Marathi News Updates : 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Bullet Train: बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा नवा टप्पा सुरू! ४० मीटर लांबीचा पहिला बॉक्स गर्डर लॉन्च

Satara Accident:'संगममाहुलीतील अपघातात भोसेतील माजी सैनिक ठार'; दुचाकी अन् ट्रकची भीषण धडक

Nashik Ganesh Visarjan : डीजे बंदी झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; नाशिकमध्ये शांततेत पार पडला सोहळा

SCROLL FOR NEXT