पुणे

चाकणला तोतापुरी आंब्याची गोडी

CD

चाकण, ता. १३ : चाकण (ता.खेड) येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. १३) कर्नाटकहून सुमारे वीस टन तोतापुरी आंब्याची आवक झाली. ग्राहकांच्या पसंतीस आंबा उतरल्याने त्यास मागणी वाढली. यामुळे त्याला घाऊक बाजारात वीस रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला.

कांद्याची आवक अकराशे क्विंटल झाली. त्यास किमान १० ते कमाल १६ रुपये बाजारभाव मिळाला. मध्यप्रदेश राज्यातील इंदोर, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तसेच गुजरात राज्यातून बटाट्याची दीड हजार क्विंटल आवक झाली.

बाजारात भुईमुगाच्या शेंगाला प्रतिकिलोला बाजारभाव किमान चाळीस ते कमाल पन्नास रुपये मिळाला. राज्यातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला अगदी पंधरा ते पंचवीस रुपये बाजारभाव मिळाला.
महात्मा फुले बाजार आवारात बटाट्यास प्रवारीनुसार किमान १२ ते २१ रुपये बाजारभाव मिळाला.
सध्या पाऊस पडत असल्यामुळे साठवलेल्या कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वखारीत कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे ,उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
बाजार आवारात हिरव्या मिरचीची दिल्लीतून तसेच राज्यातील बुलडाणा व इतर भागातून सुमारे ५० टन आवक झाली. मिरचीला प्रतिकिलोला किमान ५० ते कमाल ७० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात हिरवी मिरची शंभर रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.

फळभाज्यांचे बाजारभाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलोचे भाव) : टोमॅटो : १५ ते २५, कारली : ५० ते ६०, दोडका : ५०ते ६०, भेंडी : ४० ते ६०, गवार : ६० ते १००, कोबी : १० ते १८, फ्लॉवर : १० ते २०, वांगी : ५० ते ६०, काकडी : १५ ते २५, वालवर : ६०ते ९०, हिरवी मिरची : ५० ते ७०, दुधी भोपळा : २० ते ३०, शेवगा : ४० ते ६०, ढोबळी मिरची : ५० ते ६०, चवळी : ३०ते ४०.


कोथिंबिरीची जुडी तीन रुपयांना
घाऊक बाजारात मेथी, कोथिंबिरीच्या सुमारे दोन लाख जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला आठ ते १०रुपये भाव मिळाला तर कोशिंबिरीच्या एका जुडीला दोन ते ३ रुपये भाव मिळाला. शेपूच्या पाच हजार जुड्यांची आवक झाली. शेपूच्या एका जुडीला पाच ते आठ रुपये भाव मिळाला तर पालकच्या सुमारे चार हजार हजार जुड्यांची आवक झाली. पालकच्या एका जुडीला सहा ते दहा रुपये भाव मिळाला.


08797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT