पुणे

चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुवर्णा गोरे

CD

चाकण, ता. ४ : रोटरी क्लब ऑफ चाकणच्या अध्यक्षपदी सुवर्णा गोरे, तर सचिवपदी डॉ. प्रज्ञा भवारी यांची निवड केली आहे. नूतन संचालक मंडळाने नुकताच कार्यभार स्वीकारला.
चाकण (ता. खेड) येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरीचे प्रांतपाल संतोष मराठे, माजी आमदार दिलीप मोहिते, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, रोटरीचे उपप्रांतपाल विनसेन्ट सालेर आदी उपस्थित होते. या वेळी प्रांतपाल यांनी नूतन अध्यक्ष गोरे व सचिव भवारी यांचा सत्कार केला.
याप्रसंगी गरजू व आर्थिक दुर्बल महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. नवीन सदस्यांचा सत्कार केला. मागील अध्यक्ष डॉ. अमोल बेनके यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. या वेळी सचिव चंद्रकांत हिवरकर व इतर उपस्थित होते. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. बेनके यांनी व सदस्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. रोटरीचे प्रांतपाल मराठे यांनी चाकण रोटरी क्लबच्या वतीने केलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.
बेस्ट रोटरियन म्हणून मोहन परदेशी, भगवान घोडेकर यांचा सत्कार केला. भगवान घोडेकर, विनय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. श्यामराव देशमुख यांनी आभार मानले.
या वेळी सुरेखा मोहिते, ध्रुव कानपिळे, तुकाराम कांडगे, संदीप बागडे, डॉ. पल्लवी बेनके, रोहिणी देशमुख, सुधीर काकडे, ज्ञानेश्वर सातव, अतुल वाव्हळ, सुहास गोरे, सुभाष शिंदे, डॉ. देवराज पाटील, डॉ. महाजन, डॉ. विजय भवारी, नितीन पाटील, चंद्रकांत गोरे, महेश कांडगे, संभाजी सोनवणे आदी उपस्थित होते. अध्यक्ष सुवर्णा गोरे यांनी या वर्षी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT