पुणे

गणेशोत्सवात हिरवी मिरची गडगडली

CD

चाकण, ता.३१ : चाकण (ता. खेड) येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता.३१) बुलडाणा तसेच कर्नाटक राज्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. मिरचीला प्रतिकिलोस कमाल ४० रुपये बाजारभाव मिळाला. बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. टोमॅटोला पावसामुळे मागणी रोडावली होती. मात्र, प्रतिकिलोला १८ ते ३० रुपये बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारात त्यास सुमारे साठ रुपये बाजारभाव मिळाला.
बाजारात बेळगावी रताळ्याची सुमारे दहा टन झाली. घाऊक बाजारात त्यास वीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला. उत्तरप्रदेश, आग्रा, मध्यप्रदेश, इंदोर, गुजरात येथून बटाट्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिकिलोला चौदा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची सुमारे दीड हजार क्विंटल आवक झाली. सध्या नवा कांदा बाजारात येण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. परराज्यातीलही नवा कांदा बाजारात विक्रीसाठी अजून आलेला नाही. कांद्याला प्रतिकिलोला किमान दहा रुपये ते कमाल सतरा रुपये भाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावत घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याचे बाजारभावात घाऊक बाजारात दहा ते १५ रुपयांनी घसरले आहेत.

फळभाज्यांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलोचे भाव) : टोमॅटो : १८-३०, कारली : २०:३०, दोडका : ३०-४०, भेंडी :२५-३५, गवार :३०-५०, कोबी : ४ ते ७, फ्लॉवर : ७- १२, वांगी : २५-३५, काकडी : १६, वालवर : २०-४०, हिरवी मिरची :३० :४०, दुधी भोपळा : १०-२०, शेवगा : ३०-६०, ढोबळी मिरची : ३०-४०, चवळी : २०-३०, हिरवा वाटाणा : ६०-८०, गाजर : २५-३५, आले :२५-३५.

आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांत नाराजी
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक च्या सुमारे एक लाख वर जुड्यांची आवक झाली . कोथिंबीर, शेपू, पालक ,मेथीच्या एका जुडीला फक्त पाच ते दहा रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या बाजारात फळभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.


09196

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT