पुणे

कडाचीवाडी तलावात श्रींच्या विसर्जनास बंदी

CD

चाकण, ता. ५ : कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलाव खेड तालुक्यात सर्वांत मोठा आहे. पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या तलावात यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास ग्रामपंचायतीने पूर्णपणे बंदी केलेली आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करणे, निर्माल्य टाकणे अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणाऱ्या व्यक्तीस दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी नीलेश पांडे यांनी दिली.
कडाचीवाडी येथील पाझर तलावात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. चाकण परिसर रहिवासी वस्तीने मोठा झालेला असल्यामुळे तसेच पाझर तलावाच्या शेजारी वन विभागाची हद्द असल्याने या जंगलात फिरण्यासाठी काही पर्यटक येतात तसेच कामगार इतर लोक, शाळकरी, महाविद्यालयीन मुले येथे फिरण्यासाठी येतात. तलावात पोहण्यासाठी येतात. या तलावात आतापर्यंत सुमारे २५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. हा पाझर तलाव पोहण्यासाठी धोकादायक आहे. तीन महिन्यांपूर्वी चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, त्यामुळे ग्रामपंचायतीने या परिसरात कोणी पाण्यात उतरून पोहू नये व इतर सूचनावजा फलक लावलेले आहेत. परंतु काहीजण पर्यटनासाठी येतात. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही येतात पार्ट्या करतात. चालक वाहने धुण्यासाठी येतात. शक्यतो पाणी जनावरांना पिण्यासाठी आहे. या पाझर तलावाच्या पाण्याच्या पाझरातून पाणी मिळण्यासाठी पाझर तलावाखाली कडाचीवाडी, मेदनकरवाडी या दोन गावांच्या पाणीपुरवठा विहिरी आहेत. त्यामुळे या पाझर तलावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तलावाचे पाणी कोणीही प्रदूषित करू नये, असे ग्रामपंचायत अधिकारी पांडे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

SCROLL FOR NEXT