पुणे

चाकणला पेरणी झालेल्या शेतात पाणी

CD

चाकण, ता. २१: चाकण व परिसरातील गावात ऑक्टोंबर हिटमध्ये प्रथमच वळवाचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तासावर पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी पेरणी झालेल्या शेतांमध्ये पाणी साचले. पावसाचा जोर वाढल्याने ओढ्यातून, नाल्यातून पाणी वाहत होते.
चाकण शहरात पावसाने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी आले त्यामुळे पथारीवाले, हातगाडीवाले विक्रेते यांची ऐन दिवाळीच्या सणांमध्ये धांदल उडाली.
चाकण परिसरातील गावांच्या शेतात नुकतीच पेरणी झाली होती. त्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उगवणी व्यवस्थित होणार नसल्याचे तसेच उगवणीला बाधा येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीनंतर पेरणीपूर्व मशागती केलेल्या आहेत .काही ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारी व इतर पिकांची पेरणी केलेली आहे. काही शेतात लसणाची लागवड ही करण्यात आली आहे. त्यामुळे हा पाऊस काही शेतकऱ्यांना लाभदायक ठरला तर काही शेतकऱ्यांना मात्र नुकसानकारक ठरला असे शेतकऱ्यांनी सांगितले.


09573

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uganda Accident: भयंकर! ओव्हरटेक करण्याचा बस चालकाचा प्रयत्न अन्...; भीषण अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

Navi Mumbai News: दिवाळीनिमित्त पोलीस सतर्क! सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Latest Marathi News Live Update : राजदच्या श्वेता सुमन यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT