पुणे

खालुंब्रे येथील घाट रस्त्याची दुरवस्था

CD

चाकण, ता. १० : चाकण- तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे (ता. खेड) येथील खालुंब्रे घाट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी, मोटार चालकांना कसरत करावी लागत आहे.
या घाट रस्त्यावरून औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांतील अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर, टँकर ये- जा करत असल्याने हा घाट रस्ता मृत्यूचा सापळा झालेला आहे. मात्र, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप नागरिक, कामगार वाहन चालकांचा आहे. हा रस्ता अरुंद, चढण व तीव्र उताराचा आहे. येथे वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अनेक अपघात झालेले आहेत. तसेच दुचाकीचालक कामगारांचे अनेक अपघात झाले आहेत. या मार्गाची लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडे, तानाजी बोत्रे व इतरांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडे केली आहे.

या मार्गाच्या कामासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्याची निविदा खुली झाली आहे. याबाबत शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाली की या मार्गाचे, दुरुस्तीचे, खड्डे बुजविण्याचे, तसेच काही ठिकाणी मार्ग रुंदीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
- राहुल कदम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग

09684

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT