पुणे

चाकणमधील रस्त्याचे काम खोळंबले

CD

चाकण, ता. २३ : येथील चाकण- शिक्रापूर मार्गावर रुंदीकरण करून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते काम मार्गावरील झाडे न काढल्यामुळे, तसेच विद्युत रोहित्र न काढल्यामुळे काही ठिकाणी खोळंबले आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम झालेले आहे, तेही योग्य पद्धतीने झाले नाही, निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
चाकण (ता. खेड) येथील चाकण- शिक्रापूर मार्ग, तसेच चाकण- तळेगाव मार्गावर दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यासाठी, तसेच सांडपाणी वाहिनीसाठी सुमारे १० कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला होता. त्यामुळे तळेगाव चौकात रुंदीकरण करण्यात आले. सांडपाणी वाहिनीची कामे काही ठिकाणी करण्यात आली, तर काही ठिकाणी अजूनही केलेली नाहीत. शिक्रापूर मार्गावर सांडपाणी वाहिनीचे काम ज्या ठिकाणी केले त्या ठिकाणी दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, ती अर्धवट आहेत. रस्ता खोदलेला आहे, परंतु तेथे डांबरीकरणाचे काम लवकर केले जात नाही. त्यामुळे त्यात दुचाकी चालक पडतात व अपघात होतात हे भयानक वास्तव आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर यांनी सांगितले की, ‘‘ठेकेदार कंपनीने सांडपाणी वाहिनीचे काम सुरू केले आहे ते काही ठिकाणी काम झाले आहे, तर काही ठिकाणी अर्धवट आहे. ज्या बाजूने सांडपाणी वाहिनीचे काम केले नाही, त्या बाजूने सांडपाणी वाहिनीचे काम करावे. चाकण- शिक्रापूर मार्गावर एका बाजूला रस्ता रुंदीकरणासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे त्यात दुचाकी चालक पडत आहेत व अपघात होत आहेत. या मार्गाच्या रुंदीकरणात आडवी येणारी झाडे, तसेच विद्युत रोहित्र, विद्युत खांब वीज कंपनीने लवकर काढावीत.’’

ज्या ठिकाणी डांबरीकरण झालेले आहे ते काम कसे चांगले होईल याची मी पाहणी करणार आहे. डांबरीकरणाचे काम निकृष्ट होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, संबंधित कंपनीला सांगितले जाईल. मार्गावरील झाडे काढण्यासाठी नगर परिषदेला सांगितलेले आहे. नगरपरिषदेने ती झाडे काढण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागितलेली आहे. त्यानंतर झाडे काढण्यात येतील. वीज कंपनीने विद्युत रोहित्र, विद्युत खांब काढल्यानंतर त्या ठिकाणी मार्गाचे काम लवकर होईल.
- दिलीप शिंदे, उपअभियंता, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

09753

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

SCROLL FOR NEXT