चाकण, ता. २६ : येथील पुणे- नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी (ता. खेड) फाट्यावरील भराव मार्गाखाली मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची डबकी साचलेली आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना सांडपाण्यातून ये- जा करावी लागत आहे. तसेच, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या सांडपाण्यामुळे परिसरातील अनेक नागरिक आजारी पडत आहेत. मात्र, याकडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, तसेच नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांचे कोणाचेही लक्ष नाही. हे मैलायुक्त सांडपाणी रोखले नाही, तसेच सांडपाणी वाहिनीचे अर्धवट दोन महिन्यापासून रेंगाळले काम केले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाणेकरवाडीतील नागरिकांनी दिला आहे.
पुणे- नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी फाटा येथे भरावमार्ग आहे. या भराव मार्गाखालून नाणेकरवाडी गावाकडे, तसेच चाकण, पुणे- नाशिककडे पर्यायी रस्ता जातो. या मार्गावरून नाणेकरवाडीतील नागरिक व इतर नागरिकांना ये- जा करावी लागते. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे उपाभियंता दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क केला तो होऊ शकला नाही.
याबाबत नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे, उपसरपंच पूनम किशोर नाणेकर यांनी सांगितले की, ‘‘एनएचएआयचे अधिकारी दिलीप शिंदे यांना आम्ही वारंवार भेटून, तसेच फोन करून हे काम लवकर करण्याबाबत सांगितले आहे. त्यांनी फक्त लवकर काम करतो असे सांगितले. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून सांडपाणी वाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर सांडपाणी वाहते आहे. पादचाऱ्यांना ये- जा करणे अवघड झाले आहे. हे काम करताना ठेकेदार कंपनीने नाणेकरवाडी ग्रामपंचायतीची सांडपाणी वाहिनी, तसेच पाण्याच्या वाहिनी फोडलेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती केलेली नाही. आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र ते लक्ष देत नाहीत. आम्हाला फक्त काम करतो असे म्हणतात.’’
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी छाया इरणक यांनी सांगितले की, ‘‘याबाबत एनएचआयचे अधिकारी शिंदे यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून, तसेच अनेकवेळा फोनद्वारे सांगितलेले आहे. मात्र, त्यांनी काही काम केलेले नाही.’’
09769
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.