पुणे

चाकण शहर स्मार्ट सिटी करणार

CD

चाकण, ता. २७ : ‘‘चाकण शहर स्मार्ट सिटी करण्याकडे, तसेच शहरामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझे सासरे कालिदास वाडेकर यांनी शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सातत्याने केला. त्यामुळे शहरासाठी सुमारे १६० कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. या योजनेचा पाठपुरावा केल्याबद्दल अनेक महिलांनी त्यांचे औक्षणही केले. शहराच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्या योजनेचे काम सुरू झालेले आहे. लवकरच शहराला सुधारित पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणार आहे,’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराने वेग घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांनी शहरात घरोघरी, दारोदारी प्रचार सुरू केलेला आहे. त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘मी उच्चशिक्षित आहे. शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. शहरातून प्रचार करत आहे. त्यावेळी मतदारांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. महिलांचा पाठिंबा मिळत आहे. तरुणींचा पाठिंबा मिळत आहे. चाकण शहराच्या नगराध्यक्षपदासाठी उच्चशिक्षित महिला असणे गरजेचे आहे. कारण, शहरातील समस्या अनेक आहेत. त्या सोडवण्यासाठी हुशार, तसेच अभ्यासू महिला नगराध्यक्षपदी असणे गरजेचे आहे. त्यामुळे मला नागरिकांचा व मतदारांचा मोठा पाठिंबा आहे.’’
महिला मतदारांनी भाग्यश्री वाडेकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, शहरातील मतदारांचा, तसेच महिला वर्गाचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. तुमचे शिक्षण एमबीए झालेले आहे. त्यामुळे शहरातील समस्या सोडविण्यासाठी तुमच्या या शिक्षणाचा नक्की फायदा होणार आहे. तुमचा विजय निश्चित आहे.

०९७७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT