चाकण, ता.३० : तळेगाव-चाकण मार्गावर खराबवाडी (ता.खेड) येथे रविवारी (ता.३०) पहाटे तीनच्या सुमारास मालवाहू कंटेनरला आग लागली. या आगीत कंटेनरसह त्यातील बजाज इलेक्ट्रिकलच्या ४० दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथे कंटेनरला आग लागल्याचा ११२ नंबर वर फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर महाळुंगे पोलिस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. तेथे कंटेनर क्रमांक (एनएल-०१-एई -७३४६) आग लागली होती. ती आटोक्यात आणण्यासाठी चाकण नगरपरिषद व एमआयडीसीचे अग्निशमन बंब बोलविले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत ट्रकचालक रिशीपाल शिर सिंह (वय- २९, रा. मोहम्मदपूर घिरोर, मैनपुरी, उत्तर प्रदेश) याच्याकडे पोलिसांनी केली. दरम्यान, कंटेनरचालक खराबवाडी येथे एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो मार्गावर परत आला. कंटेनर उभा असताना मार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने कंटेनरमधून धूर निघत आहे, असे कंटेनर चालकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.
09794, 09795
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.