पुणे

चाकणला मतदान केंद्रांवर रांगा

CD

चाकण, ता. २: नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ प्रभागांत ३६ मतदान केंद्रावर दिवसभर मोठ्या प्रमाणात रांगा होत्या. सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत थंडीचे प्रमाण जाणवत असल्याने सकाळी रांगा जाणवल्या नाहीत; परंतु कामगार वर्गाने सकाळी मतदान उरकून घेतले व कामगार वर्ग औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामासाठी गेला असे चित्र होते. सकाळी अगदी मतदान केंद्रावर १० ते १३ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.
चाकण (ता. खेड) येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ प्रभागांसाठी ३६ मतदान केंद्र करण्यात आली होती. ३६ मतदान केंद्रात दिवसभर रांगा होत्या. मतदारांनी मतदान करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार मतदारांना घेऊन मतदानस्थळी येत होते. मतदारांना मतदार यादीतील मतदार क्रमांक असलेल्या मतदानासाठी आवश्यक असलेल्या स्लीप पोलिंग बुथवर दिल्या जात होत्या. यासाठी बीएलओ ही काम करत होते. मतदान केंद्रावर मतदारांसाठी स्वागत मंडप, आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच व्हीलचेअरची सुविधा करण्यात आली होती. व्हीलचेअरवरून स्वयंसेवक, कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रात घेऊन जात होते. मतदान झाल्यानंतर व्हीलचेअरवरून पुन्हा त्यांना त्यांच्या वाहनात बसवत होते. चाकण येथील मतदान केंद्रात मतदान शांततेत होण्यासाठी सशस्त्र राखीव पोलिस दलाचा चोख बंदोबस्त होता. मतदान केंद्राच्या बाहेर आखून दिलेल्या मार्किंगच्या बाहेर कार्यकर्ते, पोलिंग बूथ यांना ठेवण्यात आले होते. काही उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना मतदार क्रमांक स्लीप प्रिंटर मशीनवरून देत होते. बहुतांश उमेदवार, कार्यकर्त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला होता. त्यामुळे मतदार यादीतील क्रमांक लगेच मिळत होते तसेच मतदारांना मतदार क्रमांकाच्या स्लीप तत्काळ मिळत होत्या.

खास वाहन, नाश्‍ता, जेवणाची सोय
अनेक उमेदवारांनी मतदारांना त्यांच्या निवासस्थानापासून मतदान केंद्रापर्यंत ये-जाण्यासाठी वाहनांची खास व्यवस्था केली होती. काही उमेदवारांनी मतदारांसाठी नाश्त्याची, जेवणाची सोय केली होती. उमेदवार कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मतदार हा राजा होता. त्याला हात जोडून कोणी विनवणी करत होते. त्याच्या गळा भेटही घेत होते. कानोकानी लागत होते. मतदारांना खूष करण्यासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.


9806, 9807

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT