चाकण, ता. २: नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना प्रलोभीत करण्यासाठी व कार्यकर्त्यांनी अगदी एका मताला दहा ते वीस हजार रुपयांचे वाटप केले. आजही दिवसभर वाटप कोपऱ्या कोपऱ्यात काही घरोघरी, वाहनात सुरू होते. पोलिसांना काही तक्रारी येत होत्या. पण उमेदवार, कार्यकर्ते हुशार होते ते कानोसा घेऊन हे सर्व काम करत होते, असे वास्तव होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल निवडणुकीच्या निमित्ताने बाजारात झाल्याची शहरात चर्चा रंगली आहे.
चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत मते विकत घेण्याकडे बहुतांश उमेदवारांनी कल वळवलेला होता. हॉटेलमध्ये, ढाब्यावर पार्ट्या तसेच मतदारांसाठी जेवणावळी यावरही मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा भर होता. आजही हॉटेल, ढाब्यामध्ये मतदारांच्या पार्ट्या रंगत होत्या. काही मतदार लक्ष्मी दर्शन घेतल्याशिवाय मतदानाला येत नव्हते असेही चित्र होते. त्यामुळे लक्ष्मी दर्शनाची चर्चा मात्र चाकण शहरात तसेच उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये मोठी होती. याने एवढे वाटप केले त्याने तेवढे वाटप केले अशा चर्चा अगदी मतदान केंद्राबाहेरही रंगत होत्या. काही मतदारांना पैशाचे वाटप करून मतदार यादीतील क्रमांकाची स्लीप उमेदवार ,कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होती. ‘‘काही ठिकाणी पैसे वाटप सुरू असलेल्या तक्रारी पोलिसांना येत होत्या. काही उमेदवार, कार्यकर्ते मात्र लपून छपून पैसे वाटप करत होते. तक्रारी आल्यानंतर पोलिस माहिती घेत होते’’ असे चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.