पुणे

चाकण- शिक्रापूर मार्गावरील जुनी झाडे तोडण्यास सुरुवात

CD

चाकण, ता. १० : येथील माणिक चौकाजवळील चाकण- शिक्रापूर मार्गावरील जुनी झाडे तोडण्याचे काम बुधवारपासून (ता. १०) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रहदारीला होणारा मोठा अडथळा आता दूर होणार आहे.
सध्या माणिक चौक ते चाकण- शिक्रापूर मार्गावरील रामनगरजवळील ओढा असे ५०० मीटर डांबरीकरणाचे काम केले आहे. माणिक चौकात अगदी १५० वर्षांपूर्वीचा पिंपळ आहे. हा पिंपळही तोडण्यात येणार आहे. या मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी व रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे संबंधित ठेकेदार कंपनीने तोडण्याचे काम हाती घेतलेले आहे. ही झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे व रुंदीकरण झाल्यानंतर त्या मार्गावरून वाहने वळविण्यात येणार आहेत.
चाकण- शिक्रापूर मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नगरपरिषदेने पुन्हा नवीन झाडे लावावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

चाकण- शिक्रापूर मार्गावर रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे संबंधित ठेकेदार कंपनीने तोडलेली आहेत. तेथे डांबरीकरण करण्यात येणार आहे. रुंदीकरण झाल्यानंतर तेथून वाहतूक चालू होईल.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, चाकण

09865

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT