पुणे

चाकण- तळेगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी

CD

चाकण, ता. ३० : चाकण- तळेगाव मार्गावर सुदापुल, खांलुब्रे, महाळुंगे, खराबवाडी, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी तळेगाव- चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच नितीन गाडे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हा मार्ग औद्योगिक वसाहतीतून जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये- जा सुरू असते. तसेच, कामगार वर्ग व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये- जा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात कामगारांचे अपघात झालेले आहेत. त्यात अनेकांचे जीव गेलेले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवावेत. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी, खड्ड्यांवर खडी- डांबरीकरण करण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच, महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास मंगळवारी (ता. २०) आमरण उपोषण किंवा रास्ता रोको करण्यात येईल, असेही गाडे यांनी सांगितले.

09956

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT