पुणे

चाकणला शौर्यभूमी संग्रामदुर्ग महोत्सव

CD

चाकण, ता. ५ : चाकण (ता. खेड) येथील किल्ले संग्रामदुर्ग येथे अखिल भारतीय विद्यार्थी सेना, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा पतसंस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवारी (ता. १) शौर्यभूमी संग्रामदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी श्री दामोदर/ विष्णू मंदिरामध्ये २५ जोडप्यांच्या हस्ते अभिषेक, तसेच पूजा संपन्न झाली. यानंतर संग्राम दुर्ग चषक- पावनखिंड दौडचे आयोजन केले होते. दौडचे उद्‍घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके, चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, खेड क्रीडा संघटना अध्यक्ष नितीन वरकड, प्राचार्य अनिल ठुबे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन पुण्याचे विलास वहाणे, अशोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉक्टर असोसिएशन चाकण, तसेच चाकण नगरपरिषद यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी गुरुवर्य विद्या वत्सल अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्‍घाटन डॉ. वहाणे, ॲड. झिंजुरके, राहुल वाडेकर, अनंत देशमुख, विवेकानंद केंद्र विद्यालय, आसामचे प्रा. सुमन धर, प्रा. बासुदेव उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी शिवकालीन युद्ध कला व योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. चाकण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा भरवण्यात येतात. या सर्व स्पर्धेचे बक्षीस व पावनखिंड दौडमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी किल्ल्यांच्या सर्व कामांचा पाठपुरावा केला जातो व ती सर्व कामे पूर्ण करून घेतली जातात. खंदकांचे बांधकाम, बुरुजाची दुरुस्ती, किल्ल्यातील साफसफाई, खंदकामध्ये दुरुस्ती करताना सापडलेल्या भग्न झालेल्या मूर्तींचे अवशेष, नियोजित संग्रहालय, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नियोजित स्मारक देखील करण्याचा मानस प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. या सर्व उपक्रमाचा माहितीपट सादर करण्यात आला. यावेळी भक्ती- शक्ती या विषयावर प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले.
यावेळी चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, सत्यवान तांबे, ॲड. सर्जेराव पानसरे, चंद्रकांत इंगवले, ॲड. किशोर झिंजुरके, योगेश साखरे, संतोष लोणारी, संतोष पडवळ, भालचंद्र झिंजुरके, रवी शिंदे, विशाल बालघरे, शैलेश कड, तसेच स्मारक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल वाडेकर, राजू दीक्षित यांनी, तर ॲड. किरण झिंजुरके यांनी आभार मानले.

09979

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

SCROLL FOR NEXT